पहूर येथील संतोषीमाता नगरात औषध फवारणी

 

पहूर, ता.जामनेर, प्रतिनिधी । संपूर्ण भारतात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने खबरदारी घेवून सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. यानुसार पहूर येथे आरोग्य दूत अरविंद देशमुख यांच्यातर्फे फवारणी करण्यात आली.

कोरोना या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांचे खंदे समर्थक आरोग्यदूत अरविंद देशमुख, माजी जि.प.सदस्य राजधर पांढरे, सरपंच निताताई पाटील, रामेश्वर पाटील, संजय देशमूख, सचिन कुमावत, व भाजपा पहूरतर्फे येथील संतोषीमातानगर येथे टॅकरवर मशीन बसवून त्या पाण्यात सोडीयम व्लोराईड टाकून निर्जंतुकर्णाची फवारणी करण्यात आली.

Protected Content