यावल प्रतिनिधी । तालुक्यातील साकळीतील आंबेडकर नगरात बेकायदेशीर अवैधरित्या होणारी दारूविक्री बंद करावी, अशी मागणीचे निवेदन येथील महिलांनी यावल पोलीस ठाण्यात देण्यात आले.
साकळी गावातील बौद्ध पंच मंडळतर्फे देण्यात आलेल्या निवेदनावर तब्बल ५२ महिला व पुरुषांच्या स्वाक्षऱ्या आहेत. राज्यासह तालुक्यात देखील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असतांना गावात बेकायदेशीर दारू विक्री होत असल्याने गावातील कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होवु शकतो. अशाप्रकारे जमाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून खुलेआम दारूची विक्री करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी बौद्ध पंच पंचमंडळ साकळीच्या वतीने करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण राज्यात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा संकटाच्या परिस्थितीमध्ये मोलमजुरी करणाऱ्या गोरगरिबांना समोर आपल्यावर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत तालुक्यातील साकळी येथील आंबेडकर नगर भागांमध्ये काहीजण आर्थिक स्वार्थ साधण्यासाठी अवैधरित्या देशी-विदेशी दारूची खुले आम विक्री करतांना दिसून येत आहे. तेव्हा या भागात दारू पिण्या करीता या परिसरात तळीरामांची मोठी गर्दी उसळत आहेत. खुलेआम होणारी ही अवैद्य दारू विक्री पोलिसांच्या नजरेआड देखील नाहीये असा आरोप करीत साकळी गावातील बौद्ध पंच मंडळीच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप करीत. गावांमध्ये होत असलेल्या दारू विक्रीमुळे गावात छोटे-मोठे वादविवादाचे प्रसंग उभे राहत आहेत तेव्हा पोलीस निरीक्षकांनी गावातील अवैद्य दारू विक्री बंद करावी व संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करावी.
यांची होती उपस्थिती
यावेळी बौध्द पंच मंडळाचे अध्यक्ष मिलिंद जंजाळे, शरद बिऱ्हाडे, विजय जंजाळे, नाना भालेराव, राजू सोनवणे, राजेंद्र जंजाळे, मंगल जंजाळे, बबन बागुल, संजय वाघ, शंकर जंजाळे, संतोष जंजाळे, नाना जंजाळे, विजय जंजाळे सह गावातील महिला व पुरुष अशा ५२ जणांच्या स्वाक्षरी असलेले निवेदन यावल पोलिसांना देण्यात आले आहे
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००