यावल येथील धान्य गोदाम कर्मचाऱ्यांना सॅनिटायझरचे वाटप

यावल प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे. आमदार शिरीषदादा चौधरी यांनी शहरातील शासकीय धान्य गोदाम कर्मचाऱ्यांना निर्जंतूकीकरणासाठी सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगासह देशातील विविध सामाजिक संस्था विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, आमदार, खासदार या संसर्गजन्य जैविक विषाणूंशी लढा देऊन संघर्ष करण्यासाठी सर्वसामान्यांच्या मदतीला धावून निघाली असून यातच यावल तालुक्यातील नागरिकांना स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून धान्य पोहोचावे. यासाठी कष्ट करून आपल्या डोक्यावर पाठीवर अन्नधान्य वाहनात टाकून नागरिकांची सेवा करणाऱ्या हमाल कर्मचाऱ्यांसाठी आज रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरिष चौधरी यांच्या सहकार्याने यांच्याकडून प्राप्त झालेल्या निर्जंतुकीकरण सेनेटराइझ लावून कोरोना सारख्या अत्यंत विषारी व घातक संसर्गजन्य आजारापासून सुरक्षिता प्रधान करण्यासाठी वितरित करण्यात आली.

याप्रसंगी निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार यांच्याहस्ते येथील धान्य गोदामातील धान्य वाहतूक वाहनांमध्ये टाकणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेनेटराईझ लावण्यात आली. याप्रसंगी पुरवठा विभागाचे धान्य गोदाम प्रमुख शेखर तडवी आदि कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी सामाजिक बांधिलकीतून आमदार शिरीषदादा चौधरी यांनी सॅनिटायझर वितरित केल्याने उपस्थित सर्वांनी त्यांचे मनपूर्वक आभार देखील मानले.

Protected Content