Home आरोग्य पुण्यात कोरोनामुळे एकाचा मृत्यू

पुण्यात कोरोनामुळे एकाचा मृत्यू


पुणे (वृत्तसंस्था) पुण्यात कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. राज्यात पहिला करोनाग्रस्त रुग्ण पुण्यात सापडला होता. मात्र, आतापर्यंत एकाही मृत्यूची नोंद झाली नव्हती.

 

पुण्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. 52 वर्षीय असलेला हा रुग्ण गेल्या 25 मार्चपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत होता. आज दुपारी त्याचा मृत्यू झाला. मयताला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्याने कोणताही परदेश प्रवास केला नव्हता. दीनानाथमध्ये या रुग्णावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते आणि सुरवातीपासून त्याची प्रकृती गंभीर होती.


Protected Content

Play sound