जळगावात जुगार खेळणाऱ्या आठ जणांवर कारवाई

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रचना कॉलनीतील दत्त मंदीराजवळ जुगार व झन्ना मन्ना खेळ खेळणाऱ्या आठ जणांवर एमआयडीसी पोलीसांनी कारवाई केली असून त्यांच्या ताब्यातील साडेसात हजाराची रोकड व साहित्य हस्तगत करण्यात आले. एमआयडीसी पोलीसात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, रामेश्वर कॉलनी परीसरातील रचना कॉलनीतील दत्त मंदीराजवळ १० ते १५ जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी जावून दत्त मंदिराच्या मागे जितेंद्र मधुकर माळी यांचे पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम हे गोलाकार बसुन झन्ना मन्ना नावाचा मांग पत्त्याचा खेळ खेळत असतांना छापा टाकून जितेंद्र मधुकर माळी, वय- ४० वर्षे, रा- प्लॉट नं. २८, रचना कॉलनी, जळगाव, गोपाल मधुकर चौधरी, यय- ४४ वर्षे, रा- रचना कॉलनी, जळगाव, नितेश शेनफडु चौधरी, वय- ३२ वर्षे, रा- जुना मेहरुण रोड, कासमवाडी, धिरज मधुकर चौधरी, वय-३२ वर्षे, रा- जुना मेहरुण रोड, रचना कॉलनी, सुदाम नारायण बोरसे, वय- ५२ वर्षे, रा- कासमवाडी, जळगाय, भुपेंद्र वासुदेव सपकाळे, वय-३८ वर्षे, रा- जुना मेहरुण रोड, कासमवाडी मनोज रविंद्र भोळे, वय- ३४ वर्षे, रा- कासमवाडी, चेतन भिवसन लोहार वय-५० वर्षे, रा- रचना कॉलनी, कासमवाडी असे आठ जणांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातील साडेसात हजाराची रोकड आणि जुगार खेळण्याचे साहित्य हस्तगत केले. पोकॉ असिम तडवी यांच्या फिर्यादीवरून आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ.आनंदसिंग पाटील, पोहेका जितेंद्र राजपुत, पोहका विजय नेरकर, पोकॉ निलेश पाटील,  पोकॉ योगेश बारी यांनी ही कारवाई केली.

Protected Content