पारोळा एस.टी.कॉलनी परीसरात कर्मचाऱ्यांकडून साफसफाई

पारोळा प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरातील एस.टी.कॉलनी राज्य परिवह महामंडळाचे कर्मचाऱ्यांनी पारोळा येथील बसस्थानक परीसरात साफसफाई केली.

येथील एस.टी. कॉलनी परीसरात जळगाव राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आज साफसफाई केली. गेल्या आठवड्यापासून कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन असल्याने राज्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवा बंद करण्यात आली आहे. काही कर्मचारी सध्या घरीच असतात. इतर ठिकाणी लोक एकत्र जमा होवुन पत्ते खेळून घाण करण्यात धन्यता मानत आहे. याला अपवाद ठरला आहे. तो एस.टी. कर्मचारीवर्ग कारण त्यांनी एकत्र जमुन व त्यांच्यातील सुरक्षीत अंतर ठेवुन, ते राहत असलेल्या एस. टी. कॉलनी परीसराची साफसफाई करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

Protected Content