Home आरोग्य कोरोना हद्दपार करण्यासाठी सर्वांनी एकत्रित लढा द्या – शरद पवार

कोरोना हद्दपार करण्यासाठी सर्वांनी एकत्रित लढा द्या – शरद पवार


मुंबई प्रतिनिधी । कारोनाचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे लढा द्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेला केले आहे.

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. यात अनेकांचा मृत्यू झाला असून लाखो लोक जगभरात बाधित आहे. आपल्या देशात ही व्यापकता आटोक्यात येण्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार, राष्ट्रीय संघटना, आंतरराष्ट्रीय संघटना यांनी काही निर्णय तातडीने घेतले आहेत. करोनाचे संकट लक्षात घेऊन आपण हे सगळे करतो आहोत हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. करोनाचे संकट अत्यंत गंभीर आहे हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे, देशातील अर्थव्यवस्थेवर याचा गंभीर आणि दीर्घकालीन परिणाम होणार आहे यात काहीही शंका नाही असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. करोनाशी लढा आपण एकत्रितपणे देऊ. सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करा असेही आवाहन शरद पवार यांनी केले.


Protected Content

Play sound