Home धर्म-समाज रावेर येथील महाजन परिवार देणार दशक्रिया विधीचे पैसे शहीद जवानाच्या कुटुंबास 

रावेर येथील महाजन परिवार देणार दशक्रिया विधीचे पैसे शहीद जवानाच्या कुटुंबास 


रावेर (प्रतिनिधी) येथील सेवानिवृत्त न.पा. कर्मचारी भागवत तुकाराम महाजन यांच्या निधनानंतर त्यांचा दशक्रिया व गंधमुक्ती विधी थोडक्यात करून वाचलेली रक्कम व नातवाच्या पहिल्या पगारातील काही रक्कम असे मिळून ११ हजार रूपयांचा निधी मलकापूर येथील शहीद जवान संजयसिंह राजपूत यांच्या परिवाराला देण्याचा निर्णय येथील महाजन परिवाराने घेतला आहे.

 

रावेर पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी भागवत तुकाराम महाजन यांचे नुकतेच (दि.११ फेब्रुवारी) रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांचा आज झालेला दशक्रिया विधी व उद्या होणारा गंधमुक्ती कार्यक्रम हा थोडक्यात करून तसेच नुकताच नोकरीस लागलेल्या नातवाच्या पगारातील काही रक्कम मिळून अकरा हजार रूपयांचा निधी काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफचे मलकापूर येथील जवान संजयसिंह भिकमसिंह राजपूत यांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय महाजन परिवाराने घेतला आहे. ही रक्कम धनादेशाद्वारे प्रत्यक्ष मलकापूर येथे जाऊन राजपूत कुटूबियांना सुपूर्त करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या वेळी मयत भागवत महाजन यांचे मोठे भाऊ सिताराम महाजन, पुत्र राजू महाजन, पिंटु महाजन, नातु आकाश महाजन यांच्यासह कुटूंबातील बाळू महाजन, चेतन महाजन, अन्य नातेवाईक व समाज बांधव उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound