फैजपूर प्रतिनिधी । जगभरात थैमान घातलेल्या कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर शासकीय कर्मचाऱ्यांना ५ हजार मास्क व सॅनिटायझर देण्यात येणार असल्याचे करोना संबधी घेतलेल्या उपाययोजनसंबंधी बैठकित रावेरचे आ.शिरिष चौधरी यांनी जाहीर केले.
करोना व रविवारी जनता कर्फ्यु संदर्भात आज शनिवारी फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयात आ.शिरिष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी त्यांनी जाहीर केले. या बैठकीत गांभिर्याने विचार विनिमय करून जनतेपर्यंत कोरोना संसर्गजन्य आजाराची गांभीर्यता पोहचविण्यासाठी सर्व शासकीय निमशासकीय स्तरावर प्रयत्न व्हावे, असे आवाहन आ.चौधरी यांनी केले.
या बैठकीत प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनीही आढावा घेत सूचना केल्या यावेळी रावेर यावल तालुक्यातील महसुल, पोलीस, आरोग्य, पालिका विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी आ.चौधरी यांनी कोरोना संसर्गजन्य आजाराची दाहकता लक्षात घेता जनता कर्फ्युमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे. ही जनतेच्या सुरक्षिततेसाठी संधी असल्याचे सांगितले व सहभागी होण्याचे आवाहन केले तसेच आरोग्य विभागाकडून वेळोवेळी मिळणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचेही सांगितले व आपण सर्व मिळून कोरोना संसर्गजन्य आजाराशी लढा देण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे तसेच प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनीही आढावा बैठकीत सूचना मांडतांना हा आजार स्टेज २ वर आहे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून नागरिकांमध्ये शासन स्तरावर जनजागृती करण्यात येत आहे. ग्राम स्तरावरिय समिती स्थापन करण्यात आल्या आहेत बाहेरून येणाऱ्या लोकांना पंधरा दिवस घरातून न निघता घरातच थांबावे अशा सूचना या समितीला देण्यात आल्याचे सांगून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे त्यांनी यावेळी आवाहन केले.
यावेळी प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले, परी.उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे, यावल तहसीलदार जितेंद्र कुंवर, रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे, पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, नगराध्यक्षा महानंदा होले, गटविकास अधिकारी डॉ सोनिया नाकाडे, किशोर सपकाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ हेमंत बऱ्हाटे, फैजपूर न.पा आरोग्य समिती सभापती नफिसाबी शेख इरफान, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, सौरभ जोशी, रवींद्र लांडे, पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, स पो.नि.प्रकाश वानखेडे, स.पो.नि.राहुल वाघ यांच्यासह महसूल, पोलीस, आरोग्य, पालिका विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर शासकीय कर्मचाऱ्यांना पाच हजार मास्क व सॅनिटायझर देण्यात येणार असल्याचे करोना संबधी घेतलेल्या उपाययोजनसंबंधी बैठकित रावेरचे आ.शिरिष चौधरी यांनी जाहीर केले उद्या रविवार पर्यंत मास्क व सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात येणार आहे