कासोद्यात कर्फ्यूला ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांचा पाठींबा

कासोदा प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशाचे पालन करण्यासाठी तालुक्यातील कासोदा येथे पुर्णतः बंदला ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद दिसून आला.

कासोदा येथील नेहमी गजबजलेल्या बिर्ला चौकात आज सकाळी ८ वाजल्यापासून शुकशुकाट दिसत आहे. जीवनावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने १०० टक्के बंद केलेली आहे. तर गावातील ग्रामस्थां सह सर्व व्यापारी वर्गाने कडकडीत बंद पुकारला असून गावातील सर्वेच दुकाने , पण टपरी बंद करण्यात आले आहे. तरी या पार्श्वभूमीवर गावातील गावठी हात भट्टीची दारू सुरळीत पणे विक्री सुरू असल्याचे गावात चर्चिले जात आहे , काही ठिकाणी जमाव बंदीचे उउल्लंघनहि होतांना दिसत आहे . तरीही अहोरात्र जनतेची सेवा करणारे जनतेचे सेवक कासोदा पोलीस स्टेशन चे स.पो.नि. रविंद्र जाधव यांच्या सह सर्वच कर्मचारी आपली सेवा बजावत असतांना दिसत आहे . सर्वत्र पोलीस स्टेशनचे कौतुक करीत आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र् पोलीस कायदा कलम – ३७ (३) १३५ नुसार जमाव बंदी करणाऱ्यांवर कारवाई व्हावी. अशी मागणी होतांना दिसत आहे.

Protected Content