Home Cities जळगाव जळगावातील गौरव भोळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

जळगावातील गौरव भोळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर


जळगाव प्रतिनिधी । येथील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयातील शिक्षक गौरव सुभाष भोळे यांना पूज्य साने गुरुजी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

अखिल भारतीय भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या केंद्रीय प्रचार कार्यालय गुरुकुंज आश्रम जि.अमरावती (महाराष्ट्र) यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येणार आहे. लवकरच पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. याबद्दल गौरव भोळे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. संस्थेचे अध्यक्ष- विजय कोल्हे, चिटणीस अवधूत पाटील, उपचिटणीस एस.डी.खडके, मुख्याध्यापिका सौ. गोसावी मॅडम, उपमुख्याध्यापक ए.व्ही.ठोसर, पर्यवेक्षक एच.जी.काळे सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound