बुलढाणा प्रतिनिधी । जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे तडाख्याने हाताशी आलेले पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हरावून घेतला आहे.
खामगाव, जळगाव, नांदुरा, मलकापूर तालुक्यात प्रचंड नुकसान झाले आहे. गारपीट अवकाळी पावसाचा तडाखा शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने आणि गारपिटीने हिरावून घेतला. 17 मार्च रोजी मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. वादळवाऱ्यात वाऱ्याने पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गहू, कांदा, मका, हरभरा ही पिके जमीनदोस्त झाली आहेत. थोडासुद्धा खामगाव तालुक्यातील बोरी, आडगाव परिसरात पावसाने नुकसान झाले होते. शासनाने त्वरित सर्व पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी द्यावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. जळगाव तालुक्यात गारपीट वादळी पाऊस जळगाव, जामोद तालुक्यात 17 मार्च रोजी संध्याकाळी 5.30 वाजताच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने गहू, हरभरा, भुईमूग, कांदा, सूर्यफूल, संत्रा, आणि मका इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संध्याकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि कारणांचा वर्षाव झाला. यावेळी आसलगाव जळगाव खेडीसह संपूर्ण तालुक्यात तालुक्यामध्ये तेवढा गारा पडल्या. यामुळे शेतातील पिकाची हानी झाली जमिनीवर आलेला गहू हरभरा वादळामुळे पसरला तर कांद्याचे नुकसान झाले. यामध्ये जळगाव वरवट रस्त्यावर झाडे कोसळून वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान वादळी वाऱ्यामुळे अनेक गावातील विद्यूत गुल झाली होती.