पिंपरी (वृत्तसंस्था) पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा संसर्ग झालेल्या तिघांच्या संपर्कात आलेल्यांसह आणखी ४१ संशयित रुग्णांचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
पुण्यातील एक ट्रॅव्हल कंपनीकडून दुबईला गेलेल्या पती-पत्नी कोरोना पॉझिटिव्ह सापडले. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील याच पथकातील दोघांसह पाच संशयित रुग्ण आढळून आले होते. त्यांची तपासणी केल्यानंतर तिघांना संसर्ग झाल्याचे गुरुवारी समोर आले. महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत शहरातील आणखी ४१ जणांचे संशयित म्हणून नमुने वैद्यकीय तपासणीसाठी पुणे येथील एनआयव्ही संस्थेत पाठविण्यात आले आहेत.