Home राजकीय मोदी-शहांनी काँग्रेस पक्ष संपवून टाकलाय : प्रकाश आंबेडकर

मोदी-शहांनी काँग्रेस पक्ष संपवून टाकलाय : प्रकाश आंबेडकर


औरंगाबाद (वृत्तसंस्था) नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांनी सोनिया गांधी यांची गोगलगाय करून काँग्रेस पक्ष संपवून टाकला, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते औरंगाबाद येथील कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी आंबेडकर म्हटले की, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी सोनिया गांधी यांची गोगलगाय करून टाकली आहे. या दोघांनी काँग्रेस पक्ष संपवून टाकला आहे. एवढेच नव्हे तर आंबेडकर यांनी एनपीआर, सीएए आणि एनआरसी या मुद्द्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य केले. तुमच्याकडे जन्माचा दाखला नसेल तर नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी तुम्हाला आई-वडील किंवा आजोबांचा जन्माचा दाखला दाखवावा लागणार आहे. मग आम्हालाच वेगळा न्याय का लावला जातो, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित करत मोदी आणि शहा यांच्यावर टीका केल आहे.


Protected Content

Play sound