जळगाव (प्रतिनिधी) येथील रेल्वे स्थानकाबाहेर काही जणांच्या एका टोळीने तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज दुपारी घडली. भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.
या संदर्भात अधिक असे की, आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानकाबाहेरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एका तरुणावर साधारण सात ते आठ जणांच्या एका टोळीने प्राणघातक हल्ला चढविला. या हल्ल्यामुळे परिसरात एकच धावपळ सुरु झाली. दरम्यान, हल्ला करणारे कोण? आणि कुणावर हल्ला झाला? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात घबराहटीचे वातावरण पसरले होते.