अखेर ‘चला हवा येऊ द्या’ची हवा गुल ! ; मागितली माफी

मुंबई प्रतिनिधी । ‘चला हवा येऊ द्या; या कॉमेडी शो मधून छत्रपती शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांचा अवमान केल्यानंतर आता या कार्यक्रमाचे निर्माते निलेश साबळे यांनी माफी मागितली आहे.

‘चला हवा येऊ द्या’ या मालिकेत दोन दिवसांपूर्वी सादर करण्यात आलेला एपिसोड वादाच्या भोवर्‍यात सापडला होता. यावरून छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी ट्विटच्या माध्यमातून संबंधीतांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. यावरू सोशल मीडियातही जोरदार टीका करण्यात आली. या पार्श्‍वभूमिवर, कार्यक्रमाचे निर्माते निलेश साबळे यांनी या वादावर स्पष्टीकरण देत जाहीर माफी मागितली आहे. निलेश साबळेचा एक व्हिडिओ वाहिनीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. ‘कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या स्किटमध्ये फोटो हा वेगळ्या अर्थानं दाखवण्यात आला होता. स्किटमध्ये वापरण्यात आलेला फोटो शाहू महाराजांचा नव्हता. तांत्रिक गोष्टीमधून ही चूक झाली असून या घडलेल्या प्रकाराबद्दल आम्ही क्षमस्व असल्याचं’ निलेश साबळेनं या व्हिडिओत म्हटले आहे.

Protected Content