सोलार प्रकल्पग्रस्तांची लक्षवेधी होळी; नेत्यांच्या प्रतिमांचे दहन (व्हिडीओ)

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील सोलर प्रकल्पाने पिडीत असणार्‍या शेतकर्‍यांनी भाजप नेत्यांच्या प्रतिमांचे होळीत दहन करून आपला रोष व्यक्त केला. तर याचसोबत महाआघाडीच्या नेत्यांकडून आपल्याला न्याय मिळावा अशी अपेक्षादेखील व्यक्त केली आहे.

काल दि ९ मार्च रोजी होळी सनाचे औचित्य साधून मौजे बोढरे येथे पिडीत शेतकर्यांनी लक्षवेधी होळीचे आयोजन केले होते, सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत पारंपारिक पद्धतीने बंजारा बोली भाषेत गीत गायनातून तत्कालीन सरकारचा निषेध व्यक्त केला, लक्षवेधी होळी साजरी करण्यासाठी पिंपरखेड, शिवापूर, लोंजे, येथील प्रकल्प पिडीत शेतकर्‍यांची मोठी गर्दी जमली होती, बोढरे येथील पिडीत शेतकर्‍यांनी या होळीचे आयोजन केले होते, यावेळी शेतकर्‍यांसाठी लढा देत असलेले कृती समितीचे अध्यक्ष भरत चव्हाण, सचिव भिमराव जाधव व गावातील मित्र परीवार मोठ्या संख्येने उपस्थित होते, लक्षवेधी होळीचे आयोजन योग्यरीत्या व्हावे यासाठी कृती समितीचे कार्याध्यक्ष किशोर सोनवणे सरांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी बेकायदा खाजगी सोलर प्रकल्पाच्या बड्या धनाढ्य उद्योगपतींना पाठीशी घालून शेतकर्यांर अन्याय करणार्या दुष्प्रवृत्तींच्या निषेधार्थ, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह, माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, व विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या फोटोचे होळीत दहन करण्यात आले. तर या प्रकरणी नविन महाविकास आघाडीच्या सरकारकडून न्याय मिळावा यासाठी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रतिमेसमोर हात झोडून पिडीत शेतकर्‍यांनी न्यायाची याचना करण्यात आली.

दरम्यान, या लक्षवेधी होळीबाबत प्रकल्पग्रस्तांनी आपली भूमिका स्पष्ट करणारे पत्रक जारी केले आहे. यात नमूद करण्यात आले आहे की, तत्कालीन फसवणीस सरकारच्या राजकीय आश्रयाखाली बड्या धनाढ्य उद्योगपतींनी गैरमार्गाने शेतकर्‍यांची फसवणूक करून सुमारे १२०० एकर शेतजमिनी कवडीमोल भावात लाटल्या. त्या विरोधात पिडीत शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून सतत शासन दरबारी न्यायासाठी लढा देत आहे, गेल्या सरकारमधील महसुल राज्य मंत्री संजय राठोड यांच्याकडे याप्रकरणी दोनवेळा बैठका होऊन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनास चौकशी अहवालही सादर झाला होता. परंतू माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्र्यावर राजकीय दबाव आणून सोलर प्रकल्पांच्या मालकांचे हितसंबंध जोपासत त्यांना पाठीशी घातल्यामुळे, शेतकरी न्यायापासून वंचित राहीले होते, फर्मी सोलर प्रकल्पाचे मालक विनित मित्तल यांना चौकशीसाठी राज्यमंत्रीनी मंत्रालयात बोलावले असता त्यावेळी बैठकीला न येता थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निघून जातांना आम्ही प्रत्यक्ष आमच्या डोळ्यांनी पाहिलेले आहे. दुसरा प्रकल्प जेबीएम सोलर या प्रकल्पाचे मालक तर दिल्लीतच बसून फोनवर फडणवीस सरकारची मदत मिळवून घेत होते, प्रकल्पावर कुठलीही कारवाई होऊ नये यासाठी, थेट फडवणीसने राज्यमंत्री संजय राठोड यांना दोनवेळा फोन आल्याचे खुद्द राज्यमंत्री यांनी पिडीत शेतकर्‍यांना सांगितलेले आहे. केवळ या आधारावरच तत्कालीन फडणवीस सरकारवर आरोप करीत नसून अशा अनेक बाबी आहेत ज्या आधारे फडवणीसने या धनदांडग्या उद्योगपतींना सर्वतोपरी राजकीय आश्रय दिल्याचे सिद्ध होऊ शकते,? शेतकर्यांचा आरोप खोटा असेल तर तसे त्यांनी स्पष्ट करावे असे आवाहन देखील वारंवार करण्यात आलेले आहेत.

पत्रकारत पुढे म्हटले आहे की, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन हे मंत्रालयात पिडीत शेतकर्‍यांना न भेटता का पळाले होते,? माजी मुख्यमंत्री फडणवीस शेतकर्‍यांना न्याय मिळू देत नाही असे महसूल राज्यमंत्रींनी सांगितल्यावर फडणवीस यांना विचारणा करण्यासाठी पिडीत शेतकर्‍यांनी मंत्रालयाच्या गेटवर ठिय्या मांडून निदर्शने केली होती. याविषयी स्वत: राज्यमंत्री संजय राठोड यांनी गिरीश महाजन यांना भेटून सांगितले होते, मी शेतकर्‍यांना जाऊन भेटतो असे गिरीश महाजन यांनी सांगितले खरे परंतू भेट न घेता शेतकर्‍यांच्या जवळून गेले परंतू भेट दिली नव्हती, यानंतर मात्र शेतकर्‍यांचा संताप अनावर झाला होता, मोठ्या आवाजात घोषणा देत शेतकर्‍यांनी मंत्रालय समोरच आत्मदहनाचा इशारा दिला होता. तात्पुरते सांत्वन करण्यासाठी प्रधान सचिवांनी ठराविक शेतकर्‍यांना मुख्यमंत्री कार्यालयात बोलावून अश्‍वासन दिले होते की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर टाकून बैठक घेऊन शेतकर्‍यांना न्याय दिला जाईल असे प्रधान सचिव भुषण गगराणी यांनी सांगितले होते. माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यासाठी मंत्रालयात शेतकरी गेले असता, निवेदन घेण्यास टाळाटाळ केली होती, शेतकर्‍यांनी चहूबाजूंनी घेराव घालून निवेदन घेण्यास भाग पाडले होते, त्यावेळी त्यांच्याकडून मागणी करण्यात आली होती की, प्रकल्पाच्या बेकायदेशीर कारभाराची चौकशी लावून पिडीतांना न्याय द्यावा ,महत्वाचे म्हणजे त्यावेळी प्रकल्पाचे काम सुरू देखील झाले नव्हते, कंपन्या गाव गुंडाच्या मदतीने जबरदस्ती शेतजमिनीवर ताबा मिळवताहेत ही बाब लक्षात आणून दिली होती. यावर पाटील यांनी शेतकर्‍यांना अश्‍वासन दिले होते की, चौकशीअंती कारवाई करून शेतकर्‍यांना न्याय देऊ परंतू त्यांनी या प्रकरणी साधी विचारपूस देखील न करता मुख्यमंत्री फडणवीच्या सांगण्यावरून प्रकल्पाला उलट सगळी मदत पुरविण्याचे काम केले होते.

यात पुढे म्हटले की, यावेळचे आमदार, व विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना वेळोवेळी निवेदने देऊन न्याय मागितला परंतू यांनी देखील कुठलीच दखल घेतली नाही, शेतकर्‍यांवर होत असलेला अन्याय गप्प पडून पाहतच राहीले, प्रसार माध्यमांशी याविषयी बोलायचे टाळले,वरीष्ठ नेत्यांच्या दबावाखाली दोन वर्ष तोंडाला कुलूप लावून तमाशा पाहत राहीले, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकर्‍यांना तात्पुरते शांत करण्यासाठी तहसील कार्यालयात बैठक घेऊन सबंधित अधिकार्यांना चौकशीच्या सुचना दिल्या होत्या परंतू, पुढे अढावा बैठक घेऊन प्रकल्पावर कारवाई करण्याची वेळ आली तेव्हा पुन्हा पाहिल्यासारखे गप्प राहीले आहे.

या बाबींचा निषेध करण्यासाठीच आपण लक्षवेधी होळी केल्याचे या गावकर्‍यांनी नमूद केले आहे.

पहा याबाबतचा हा व्हिडीओ.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/214691573057113/

Protected Content