जळगावात अवैध दारू विक्री करणाऱ्या तिघांवर कारवाई

जळगाव प्रतिनिधी । शहरात अवैधरित्या देशी आणि विदेशी दारू विक्री करणाऱ्या तीन जणांवर एमआयडीसी पोलिसांनी करवाई केली असून तिघांकडून 17 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आज धुलीवंदनाच्या निमित्ताने ड्राय-डे असल्यामुळे आज दारू विक्री बंद असल्यामुळे शहरातील सुप्रिम काँलनी मच्छी बाजार येथे संदिप शालीग्राम आडेकर (वय 28) रा.मालहबदा ता.सोयगाव जि.औ.बाद हा देशी दारुची विक्री करीत असतांना मिळुन आला असुन त्याचे कब्ज्यात एकुन 988/- रु किमतीच्या देशी टँगो पंच कंपनीच्या एकुन 19 बाटल्या जप्त करण्यात, हाँटेल सुमेरसिंग समोर अयुब शब्बीर पटेल (वय 40) रा.पिंपळकोठा ता.एरंडोल हा विदेशी दारुची चोरटी विक्री करीत असतांना मिळुन आला असुन त्याच्या ताब्यातुन एकुन 14150/- रु किमतीच्या विदेशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आणि नवीन गुरांच्या मार्केट जवळ असलेल्या हाँटेल मामाजीचे मागील बाजुस इसम नामे यशवंत नामदेव महाडीक (वय 52) वर्षे खेडी ता ).जि.जळगाव हा गैरकायदा देशी विदेशी दारुची विक्री करतांना मिळुन आला असुन त्याच्या ताब्यातुन एकुन 2360/- रु .कि च्या देशी विदेशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहे.

यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक रणजित शिरसाट यांना मिळाल्यावर त्यांचे पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, संभाजी पाटील, गोविंदा पाटील, इम्रान सय्यद, महेंद्रसिंग पाटील, मुदस्सर काजी, हेमंत पाटील, सचिन पाटील, सचिन चौधरी यांनी केलेली आहे. सदरची कारवाई ही ड्रायडे निमित्त करण्यात आलेली आहे.

Protected Content