पुणे (वृत्तसंस्था) डिलीव्हरी देण्यासाठी आलेल्या स्विगी बॉयने एका तरुणीसमोर पॅन्टचे बटण आणि चेन खोलून घाणेरडे कृत्य करत विनयभंग केल्याची संतापजनक घडलीय. याप्रकरणी पिडीत तरुणीने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कंपनीच्या व्यवस्थापकासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणी विधी शाखेच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. तिने ऑनलाईन पध्दतीने स्विगी कंपनीच्या वेबसाईटवरुन खाद्य पदार्थाची ऑर्डर केली होती. डिलीव्हरी बॉय रात्री दहा वाजेच्या सुमारास ऑर्डर घेऊन आला. ऑर्डर सुपूर्द केल्यानंतर त्याने पिडीत तरुणीला पाणी मागितले. पिडीत तरुणी पाणी आल्यावर डिलिव्हरी बॉय पॅन्टचे बटण आणि चेन खोलून समोर उभा होता. यानंतर त्याने घाणेरडे कृत्य करत पिडीतेचा विनयभंग केला. घाबरलेल्या पिडीत तरुणीने तातडीने दरवाजा लावून घरात धाव घेतली. यानंतर तिने स्विगी कंपनीच्या कस्टमर केअरकडे तक्रार दाखल केली. मात्र याबाबत कंपनीने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. तसेच जाणीवपूर्वक ही घटना लपविली. त्यानंतर पिडीत तरुणीने डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. याप्रकरणी कंपनीच्या व्यवस्थापकासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.