नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्ली हिंसाचाराबाबत संघ परिवार आणि दिल्ली पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या आशियानेट आणि मीडिया वन या दोन मल्याळी टीव्ही चॅनेल्सवर एकतर्फी वार्तांकन केल्याचा आरोप ठेवत ४८ तास बंदीचे आदेश देण्यात आले होते. परंतू या निर्णयावर टिकेचा भाडिमार होताच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही बंदी मागे घेतली आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बंदी लादताना हिंसाचाराचे वार्तांकन करताना केवळ एका समूदायाकडे लक्ष्य करण्याचा प्रयत्न होता. तसेच पवित्र ठिकाणांवर हल्ला करण्यात आल्याचे दाखवण्यात आले. तसेच आरएसएस आणि दिल्ली पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे होते. केंद्र सरकारने हिंसाचार नियंत्रित करण्यासाठी कोणतीही कृती केली नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर सुरक्षा पथके हिंसाचारग्रस्त भागात उशीरा पोहोचली. दिल्ली हिंसाचारावरून चॅनेलने केलेले वार्तांकन हे पक्षपाती आणि एकतर्फी होते, असे आरोप ठेवण्यात आले होते.