येस बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध: खात्यातून ५० हजारच काढता येणार

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने येस बँकेवर निर्बंध लादले असून ग्राहकांना खात्यातून ५० हजार रुपयेच काढता येणार आहे.

खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या येस बँकेवर ३० दिवसांसाठी निर्बंध लादण्यात आले आहेत. आज संध्याकाळपासून सुर झालेले हे निर्बंध ३ एप्रिल पर्यंत असतील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. ३० दिवसांसाठी येस बँकेचं संचालक मंडळही निलंबित करण्यात आलं आहे. बँकेवर एसबीआयचे माजी मुख्य आर्थिक अधिकारी प्रशांत कुमार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Protected Content