मध्य प्रदेशातील ऑपरेशन लोटस अयशस्वी ; ४ आमदार अजूनही बेपत्ता !

भोपाळ (वृत्तसंस्था) राज्यसभेच्या निवडणुकीआधीच मध्य प्रदेशात काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपाने सुरु केलेले ‘ऑपरेशन लोटस’ अयशस्वी ठरले आहे. परंतू कॉंग्रेसचे ४ आमदार अजूनही बेपत्ता आहेत.

 

काँग्रेस आघाडीतल्या काही नाराज आमदारांना मंगळवारी रात्री चार्टर्ड विमानाने दिल्लीला नेण्यात आले. आमदार दिल्लीला रवाना होत असताना एका गनमॅनने फोन केला. याच कॉलमुळे आमदार दिल्लीत एकत्र थांबणार असल्याची माहिती फुटली. त्यामुळे काँग्रेसला बराच अवधी मिळाला. यानंतर काँग्रेसचे मंत्री जीतू पटवारी आणि जयवर्धन सिंह तातडीने दिल्लीला रवाना झाले. तर काँग्रेसने त्यांच्या ११४ आमदारांना व्हिप बजावला. कोणत्याही आमदाराने पक्षाचा व्हिप अमान्य केल्यास त्याचे विधानसभेतले सदस्यत्व रद्द होईल, असे म्हटले होते. दरम्यान, राज्य सरकारला पाठिंबा देणारे काँग्रेस आघाडीतले १२ आमदार मंगळवारी दिल्लीत पोहोचणे अपेक्षित होते. यापैकी १० आमदार दिल्लीत पोहोचलेदेखील होते. परंतू ऐनवेळी सर्व योजना फसली.

Protected Content