नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशभरात कोरोना व्हायरसचे १२ रुग्ण असल्याची पुष्टि झाली आहे. यात आग्र्यातील ६ रुग्णांचा समावेश आहे, जे दिल्लीतील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आले होते. दरम्यान, घाबरण्याची गरज नाहीये. यासाठी चांगल्या पद्धतीचे उपचार केले जातील, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.
इटलीवरुन आलेल्या रुग्णाला कोराना झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. सध्या त्या रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. हॉस्पिटल दिल्लीमधील इटली दूतावासाच्या संपर्कात आहे. या व्यक्तीसोबत इटलीमधील १८ जण भारत दौऱ्यावर आले होते. उत्तर प्रदेशात आतापर्यंत सहा पॉजिटिव्ह केसेस आढळल्या आहेत. हे सर्वजण आग्र्यातील आहेत. रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिल्लीतील सफदरजंग हॉस्पीटलमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. तर दुसरीकडे तेलंगणा आणि दिल्लीमध्ये सोमवारी एक-एक रुग्ण आढळले आहेत. सध्या त्या दोघांचा अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. यापूर्वी केरळमध्ये तीन रुग्ण आढळले आहेत. तेलंगाणा सरकार कोरोना पीडित रुग्णासोबत ज्या २५ जणांनी बस प्रवास केला होता, त्यांचीही तपासणी करत आहेत.
jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news