Home राष्ट्रीय कोरोनाचा रुग्ण आढळला, तर गोळ्या घाला : किम जोंग

कोरोनाचा रुग्ण आढळला, तर गोळ्या घाला : किम जोंग


प्योंगगँग (वृत्तसंस्था) जर आपल्या देशात कोरोना व्हायरसचा रुग्ण आढळला तर थेट गोळी मारा, असे आदेश उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंगने दिले आहेत.

चीनवरुन परतलेल्या एका व्यापाऱ्याला कोरोना व्हायरस झाला आहे. त्या रुग्णाला गोळी मारण्याचे आदेश जोंग यांनी दिले आहेत. पीडित व्यक्तीमुळे इतर कोणाला या रोगाची लागण होऊ नये म्हणून त्यांनी हा आदेश जारी केला आहे, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, किम जोगं यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त निर्णय घेतल्यामुळे ते चर्चेत आले आहेत.

 


Protected Content

Play sound