मुंबई प्रतिनिधी । भाजपने राज ठाकरे यांना खुशाल सोबत घ्यावे असे सांगत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी या दोन्ही पक्षांच्या सख्याबाबत भाष्य केले आहे.
गत काही दिवसांपासून भाजप आणि मनसे यांच्यातील भेटी वाढल्या आहेत. यातच, आज भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची त्यांचे निवासस्थान अर्थात कृष्णकुंजवर भेट घेतली. याबाबत विचारणा करण्यात आली असता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत म्हणाले की, भाजपाचं दिल्लीत पानीपत झालं आहे. तसेच भाजपाचे खासदार नारायण राणे यांना पक्षात समावेश करुन भाजपाने पनवती लाऊन घेतली आहे. त्याचप्रमाणे राज ठाकरे आणि भाजपाच्या नेत्यांच्या भेटीगाठीच्या प्रश्नावर राज ठाकरेंना भाजपाला सोबत घ्यायचं असे तर घ्यावे, कारण मागचा इतिहास पाहिला तर भाजपाची वाटचाल ही झिरो पर्सेंटकडे चाललेली असल्याचा टोला विनायक राऊत यांनी मारला.