Home धर्म-समाज मार्च एंडच्या कामांमुळे पाच दिवसांच्या आठवड्यासाठी प्रतीक्षा

मार्च एंडच्या कामांमुळे पाच दिवसांच्या आठवड्यासाठी प्रतीक्षा

0
38

 

खामगाव, प्रतिनिधी। वीज वितरण विभागीय कार्यालयांतर्गत आजपासून सरकारी कर्मचाऱ्यांकरिता पाच दिवसाचा आठवडा लागू झाल्यानंतर पहिल्या दिवशी म्हणजे २९ फेब्रुवारीपासून हा नियम अमलात येत आहेत. परंतु महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मार्च अखेरपर्यत पाच दिवसाच्या आठवड्याची वाट पहावी लागणार आहे.

मार्च महिन्याची वसुलीचे उद्दिष्ट ठेवून आजपासून पाच दिवसाचा आठवडा अमलात येत आहे. तरी थेट आढावा घेतला असता कर्मचारी नियमित कामकाजामध्ये व्यस्त दिसून आले. मार्च महिना थकीत वीज बिल वसुलीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून का होईना सध्यातरी पाच दिवसाचा आठवडा करीता कर्मचाऱ्यांना मार्च एन्डची वाट पहावी लागणार असें म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.


Protected Content

Play sound