अहमदनगर (वृत्तसंस्था) राज्यातील शेतकरी आत्महत्यांना सरकारच्या फसव्या घोषणा जबाबदार असल्याची टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे यांनी केली आहे.
जिल्हयातील पाथर्डी तालुक्यात मल्हारी बटुळे या शेतकऱ्याने कर्जाबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. या आत्महत्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारची फसवी घोषणा जबाबदार असल्याची टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे यांनी केली. तसेच ठाकरे सरकारला लोकांच्या प्रश्नांपेक्षा सत्ता टिकवण्याचीच अधिक चिंता असल्याचा आरोप केला. एकीकडे राज्य सरकार कर्जमाफीची घोषणा करत आहे, तर दुसरीकडे कर्जबाजाराला कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. यातून राज्य सरकारच्या कर्जमाफीने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.