मोदी हे नाझीवादाचे अनुकरण करुन आपला हिंदुत्वाचा अजेंडा राबवताय : इम्रान खान

इस्लामाबाद (वृत्तसंस्था) मी यापूर्वी म्हटल्याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाझीवादाचे अनुकरण करुन आपला हिंदुत्वाचा अजेंडा राबवत असल्याची टीका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे.

 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिल्ली हिंसाचारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. मी यापूर्वी म्हटल्याप्रमाणेच मोदी हे नाझीवादाचं अनुकरण करुन आपला हिंदुत्वाचा अजेंडा राबवत असल्याचं इम्रान यांनी म्हटलं आहे. जर्मनीत नाझीने ज्याप्रमाणे अत्याचार केला होता, तसाच प्रकार दिल्लीतील हिंसारातील घटनांचे फोटो पाहून दिसत आहे. जगाने मोदींची ही कट्टरतवादी प्रतिमा स्विकारयला हवी, असेही खान यांनी म्हटले आहे.

 

दिल्लीतील या हिंसाचारावर इम्रान खाननेही मोदींना जबाबदार धरले असून 2002 च्या गुजरात दंगलीप्रमाणेच दिल्लीचाही हिंसाचार असल्याचे इम्रान यांनी म्हटले आहे. तर, मोदी हे नाझीप्रमाणे आणि हिटरलच्या पद्धतीने वागत असल्याचा गंभीर आरोपही इम्रान यांनी केला आहे. दरम्यान, यापूर्वीही इम्रान खान यांनी काश्मीर मुद्द्यावरुन मोदींवर टीका केली होती. मोदी सरकारच्या कार्यकाळात काश्मीर मुद्द्याबाबत समाधान होऊच शकत नाही. मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाजी आणि हटलर यांच्या विचारधारेचे अनुकरण करतात. त्यामुळे, भारतात मोदींचे सरकार असेपर्यंत काश्मीर मुद्द्यावर तोडगा निघणार नसल्याचे खान यांनी म्हटले होते.

Protected Content