Home राजकीय तुमच्या मनाप्रमाणे आग माझ्याही मनात लागली आहे- पंतप्रधान

तुमच्या मनाप्रमाणे आग माझ्याही मनात लागली आहे- पंतप्रधान


पाटणा (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा मोठे वक्तव्य केले आहे. “तुमच्या आणि देशवासीयांच्या मनात किती आग लागली आहे. त्याचा अनुभव मलाही येत आहे. जी आग तुमच्या मनात लागली आहे, तशीच ती माझ्या मनातही आहे.” असे सांगत त्यांनी दहशतवादाविरोधात मोठी कठोर कारवाई करण्याचा पुनरुच्चार केला आहे.

पंतप्रधान आज बिहार दौऱ्यावर होते. तेथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते. त्यावेळी मोदींनी सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या बिहारमधील जवानांना श्रद्धांजलीही वाहिली. ” पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात शहीद झालेले पाटणा येथील जवान संजयकुमार सिन्हा आणि भागलपूर येथील जवान रतनकुमार ठाकूर यांना मी आदरांजली वाहतो. त्यांच्या कुटुंबाप्रति मी माझ्या संवेदना व्यक्त करतो, असे त्यांनी यावेळी म्हटले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound