पारोळा, प्रतिनिधी। तालुक्यातील धाबे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये राजभाषा मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात आले.
राजभाषा मराठी भाषा दिवसानिमित्ताने आपली मराठी भाषा तिचे महत्व उच्चार शुध्दलेखन व मातृभाषेतुन शिक्षण याबाबात धाबे येथील जिल्हा परिषद शाळेतील विदयार्थ्यांना मार्गदर्शन त्यांची शुद्धलेखन स्पर्धा, शुध्द वाचन व छोटी भाषण घेण्यात आली. मराठी भाषेबाबत अमृताहुन गोड मराठी भाषा दाखवेल आपल्याला प्रगतीची दिशा, मराठीतुनच शिक्षण अभिमान व प्रगतीचे लक्षण, मराठी भाषा राजभाषा देईल आपल्या जीवनाला दिशा, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, माय भाषा मराठी भाषा, मराठी प्रत्येक ठिकाणी अशी घोषवाक्य विदयार्थ्यांनी लेखन केली. काही म्हणींचेही लेखन केले. बाराखडी आता चौदाखडी झाली आहे. त्यात वाढलेले दोन अक्षरे उदा अॅ व ऑ यांच्यावरून तयार होणाऱ्या शब्दांचे लेखन केले. तसेच भाषा शिक्षणासाठी बालकांना उपयुक्त असे चौदाखडीचा वापर असलेले व परिपुर्ण प्राथमिक माहिती देणारे सचित्र बालमित्र हे पुस्तक विदयार्थ्यांना उपलब्ध करून दिले.