Home Cities धरणगाव मुख्यमंत्री फडणवीस व भैय्याजी जोशी गुरुवारी धरणगावात

मुख्यमंत्री फडणवीस व भैय्याजी जोशी गुरुवारी धरणगावात


धरणगाव (प्रतिनिधी) येथील क्रांतिवीर खाज्या नाईक स्मृति संस्थेतर्फे २१ फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रा.स्व. संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी हे उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, प्रशासनाला मुख्यमंत्र्यांचा दौरा प्राप्त झाला असल्याचे देखील कळते.

 

क्रांतिवीर खाज्या नाईक स्मृति संस्थेतर्फे २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता भव्य जनजाती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रेल्वे स्टेशन समोर जळगाव रोडवर होणाऱ्या या मेळाव्याला रा.स्व. संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी मार्गदर्शन करणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष भाईदास सोनावणे, उपाध्यक्ष यशवंत कुंवर, सचिव विलास महाजन यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound