Home क्राईम लग्नाचे वऱ्हाड असलेली बस नदीत कोसळली ; २४ जणांचा मृत्यू

लग्नाचे वऱ्हाड असलेली बस नदीत कोसळली ; २४ जणांचा मृत्यू


 

बूंदी (वृत्तसंस्था) आज सकाळी लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी एक बस पापडी गावानजीक असलेल्या नदीच्या पुलावरून कोसळल्याने २४ जण ठार झाले आहेत.

राजस्थानच्या बूंदी जिल्ह्यात बुधवारी सकाळी लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी बसचा अपघाताच्या वेळी वेग खूप जास्त होता. मेज नदीच्या पुलावर आल्यानंतर बसचे नियंत्रण सुटले आणि ती नदीत कोसळली. जवळपासच्या ग्रामस्थांनी बसमधील लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिस आणि प्रशासनाला घटनेची माहिती दिली. मृतांमध्ये बहुतांश पुरुषांचा समावेश आहे.


Protected Content

Play sound