धरणगाव येथे महात्मा फुले हायस्कूलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

 

धरणगाव, प्रतिनिधी । येथील महात्मा फुले हायस्कूल येथे इ.१० वी च्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. इ.१० वीचे वर्गशिक्षक व सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.व्ही.आढावे यांनी प्रास्ताविक केले.

निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी. आर. सोनवणे मॅडम होत्या. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कुळवाडी भुषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधुन विजय बाविस्कर व इ.१० वीचे विद्यार्थी यांच्याकडून शाळेला महापुरूषांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या. शाळेतील इ.१० वी चे वर्गशिक्षक पी. डी. पाटील यांच्याकडुन इ.१० वीतील सर्व मुलींना लेखक दर्शना पवार लिखित “सावित्रीमाईंचा जन्मोत्सव ” हा ग्रंथ भेट देण्यात आला. या निरोप समारंभाप्रसंगी इ.१० वी तील मुला – मुलींनी मनोगत व्यक्त केले. यामध्ये रोहीत पटुणे, ईश्वर कुंभार, सारीका गायकवाड, निलेश पाटील, रत्ना महाजन, वैशाली देशमुख, श्रद्धा पाटील यांचा समावेश आहे. रोहीत पटुणे व निसार फकीर यांनी एक सुंदर गीत सादर केले. याप्रसंगी इ.१० वी चे वर्गशिक्षक एस. व्ही. आढावे यांनी परिक्षेविषयी सविस्तर माहिती सांगितली व महत्वाच्या सुचना दिल्या. शाळेचे शिक्षक एस. एन. कोळी , एम. जे. महाजन मॅडम यांनी मार्गदर्शन केले. वर्गशिक्षक पी .डी. पाटील यांनी ” निरोप समारंभ ” यावर सुंदर कविता सादर केली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा पी. आर. सोनवणे मॅडम यांनी मुलांना मार्गदर्शन केले व येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी शाळेच्यावतीने परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या व शाळेच्या वतीने सर्व मुलांना सस्नेह भोजन देण्यात आले. सूत्रसंचालन पी. डी. पाटील ,तर आभार एस. एन. कोळी यांनी मानले. यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Protected Content