अवैध वाळूसाठा; यावल शिक्षण संस्थेला २ लाख ८९ हजाराचा दंड

sand

यावल प्रतिनिधी । येथील महाविद्यालयाच्या परीसरात अवैधरित्या वाळूचा साठा प्रांताधिकारी डॉ. थोरबोले यांना आढळून आला होता. याप्रकरणी संबंधिक शैक्षणिक संस्थेवर २ लाख ८९ हजाराचा दंड वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

यावल शहरातील डॉ.झाकीर हुसैन उर्दू हायस्कुल व न्यु कॉलेजच्या आवारात गेल्या काही दिवसापासुन औद्यगीक प्रशिक्षण संस्थेच्या नव्या ईमारतीचे बांधकाम सुरू असुन २२ फेब्रुवारी २०२० रोजी फैजपुर विभागाचे प्रांत डॉ. अजीत थोरबोले, यावलचे तहसीलदार जितेंद्र कुंवर हे बारावीची सालांत परिक्षाच्या परिक्षा केंद्राची तपासणी करण्यासाठी डॉ. झाकीर हुसैन उर्दू हायस्कुल व न्यु. कॉलेजवर आले असता त्यांना हायस्कुलच्या आवारात वाळुची साठवण केल्याचे आढळुन आले. त्यांनी संस्था चालकांना चांगलेच धारेवर धरले होते, सदरची साठवण केलेली वाळुची चौकशी करण्याचे आदेश त्यानी तहसीलदार जितेंद्र कुवर यांना दिले होते. अखेर तहसीलदारांच्या आदेशाने यावलचे तलाठी शरद सुर्यवंशी यांनी चौकशी केल्याने अखेर तो १५ ब्रास वाळुचा साठा अनधिकृत असल्याचे चौकशी अंती निष्पन्न झाल्याने संस्थाचालकांना २५ फेब्रुवारी २०२० रोजी वाळुच्या बाजार भाव मुल्य पेक्षा पाचपट दंडाची रक्कम २ लाख ८९ हजार रुपये भरण्याचे आदेश दिले असल्याने वाळुतस्करी करणाऱ्या माफीयाच्या गोठात एकच चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान यावल शहरात काही शासकीय व निमशासकीय नव्या ईमारतीचे वेगाने बांधकाम करण्यात येत असुन वाळु लिलाव बंदी असतांना या बांधकामावर वाळु कशी येत आहे. याची देखील चौकशी महसुल प्रशासनाने करावी अशी मागणी होत आहे.

Protected Content