दिल्ली हिंसाचार : भडकाऊ भाषण देणाऱ्यावर कडक कारवाई होणे गरजेचे : गौतम गंभीर

gautam gambhir1

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीत उफाळलेल्या हिंसाचारा मागे कोणताही व्यक्ती असो, कपिल शर्मा असो वा अन्य कोणीही त्याने फरक पडत नाही, कोणत्याही पक्षाचा माणूस असला तरी भडकाऊ भाषण देणाऱ्यावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे, असे मत भाजपा खासदार गौतम गंभीर यांनी व्यक्त केले आहे. दिल्लीत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

राजधानी दिल्लीत सीएए समर्थक आणि विरोधकांमधील आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. जाफराबाद येथे सुरु असलेल्या आंदोलनावरुन सीएए समर्थक आणि विरोधक आमनेसामने आले. या दोन्ही गटाने एकमेकांवर दगडफेक सुरु केल्याने दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या संपूर्ण प्रकरणात भाजपा नेते कपिल मिश्रा यांच्याविरोधात भडकाऊ भाषण केल्याचा आरोप होत आहे. याबाबत भाजपा खासदार गौतम गंभीर यांनी कोणताही व्यक्ती असो, कपिल शर्मा असो वा अन्य कोणीही त्याने फरक पडत नाही, कोणत्याही पक्षाचा माणूस असला तरी भडकाऊ भाषण देणाऱ्यावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले आहे. दरम्यान, पूर्व दिल्लीचे खासदार गौतम गंभीर यांनी भजनपुरा-मौजपूर येथील हिंसक घटनेत जखमी झालेले डीसीपी अमित शर्मा यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. सध्या अमित शर्मा यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Protected Content