Home राजकीय बाळासाहेब थोरात यांचा राणेंना टोला

बाळासाहेब थोरात यांचा राणेंना टोला

0
33

Balasaheb thorat news
मुंबई प्रतिनिधी । महाआघाडी सरकारबाबत भाकित करणार्‍या नारायण राणे यांच्या भाकिताची गत आजवर वर्तवण्यात आलेल्या अन्य भविष्यवाण्यांप्रमाणेत होणार असल्याचा टोला महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरा यांनी मारला आहे.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कुठल्याही क्षणी कोसळू शकते. फार नाही तर येत्या ११ दिवसांत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल, असे भाकित महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी केले आहे. यावरूनच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना टोला मारला आहे. या संदर्भात ते म्हणाले की, नारायण राणे आता भाविष्य सांगायला लागले आहे. राणे हे भविष्यवाल्यांबरोबर गेल्यानेच अशा भविष्यवाण्या करायला लागले. पण आतापर्यंत जे भविष्य सांगत सांगत होते, त्याचं जे झालं ते यांचही होईल, असा टोला त्यांनी राणेंना लगावला.


Protected Content

Play sound