Home धर्म-समाज भुसावळात परीट समाजातर्फे संत गाडगेबाबा जयंती साजरी ( व्हिडीओ)

भुसावळात परीट समाजातर्फे संत गाडगेबाबा जयंती साजरी ( व्हिडीओ)

0
153

gadge baba jayanti bhusawal

भुसावळ प्रतिनिधी । येथील परीट समाजातर्फे आज संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली.

संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून येथे संत गाडगेबाबा मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बाजारपेठ पोलीस स्थानकाचे पोलीस निरिक्षक दिलीप भागवत होते. त्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. तर किसन बाविस्कर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी कीर्तन सादर केले.

यानंतर समाजाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्ष-रमेश ठाकरे, उपाध्यक्ष-कैलास शेलोडे, कार्याध्यक्ष-किसन बाविस्कर, सचिव-मनीष बाविस्कर, खजीनदार-लक्ष्मण शेलोडे, सहसचिव-माधव बोरसे, संपर्क प्रमुख-येवलेकर, प्रसिध्दी प्रमुख-वामन सपकाळे यांच्यासह सदस्य म्हणून नरेंद्र वाघ, डिगंबर जामोदकर, प्रवीण सोनवणे, योगेश बोदडे, गोपाळ बाविस्कर, एकनाथ वाघ यांची निवड करण्यात आली आहे.

पहा : गाडगे बाबा जयंती उत्सवाचा व्हिडीओ.


Protected Content

Play sound