नवी दिल्ली । अभिनेते तथा माजी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी बाबूलाल मरांडी यांच्या भाजपमधील पुर्नप्रवेशावरून आज केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर स्तुतीसुमने उधळल्याने ते भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चेला जोर आला आहे.
शत्रुघ्न सिन्हा यांनी थेट मोदी आणि शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल करून भाजपचा त्याग केला होता. आता मात्र ते पुन्हा भाजपमध्ये परतण्याची चिन्हे दिसून येत आहेत. याला कारण ठरलेय ते त्यांनी आज केलेले ट्विट. यात त्यांनी झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांच्या भाजपमधील घरवापसीचे स्वागत केले आहे. यासोबत त्यांनी मरांडी यांच्या घरवापसीच्या माध्यमातून अमित शाह यांनी मास्ट्रर स्ट्रोक खेळल्याचे कौतुकोदगार काढले आहेत. यामुळे ते भाजपमध्ये परतण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून पटणासाहीब लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. तथापि, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी त्यांना हरवले. यामुळे आता तसे अडगळीत पडलेले सिन्हा हे भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करण्याच्या चर्चेला जोर आला आहे.
Master stroke by the master strategist, Hon’ble HM #AmitShah & his team to rope in a very dear friend, man with tremendous image, integrity, credibility, leadership qualities frm CM, Jharkhand #BabulalMarandi from #Jharkhand. His ghar wapsi brings an end to his vanvas of 14yrs.
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) February 20, 2020