पिंप्रीखुर्द, ता.धरणगाव (प्रतिनिधी)– पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली देण्यासाठी आज सकाळी गावातील एरंडोल फाट्यापासून ते राम मंदिर चौकापर्यंत रॅली काढण्यात आली.
या भ्याड हल्ल्याच्या देशात सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. आज सकाळी गाव व परिसरातील ग्रामस्थांनी आणि हिंदू-मुस्लीम व्यापारी व विक्रेते एकत्र येऊन रॅलीत सहभागी झाले. यावेळेस पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध करीत रॅली काढण्यात आली. तेथे मेणबत्त्या लावून शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच सर्व व्यापारी व दुकानदारांनी आपापली दुकाने सकाळपासून ते दुपारी १.०० वाजेपर्यंत बंद करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच डॉक्टर व मेडिकल व्यावसायिकांनीही आपापले व्यवसाय बंद ठेऊन रॅलीमध्ये सहभाग नोंदवला होता.
पहा:- बंदबाबतचा हा व्हिडीओ.