अहमदनगर (वृत्तसंस्था) दोन तासांच्या कीर्तनातून एखादा शब्द चुकीचा जाऊ शकतो. तो माझ्याकडून किंवा कुणाकडूनही जाऊ शकतो, अशा शब्दात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी इंदुरीकर महाराजांची पाठराखण केली आहे.
हभप किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी एका किर्तनात त्यांनी समतिथीला स्त्रीयांशी संबंध ठेवल्यास मुलगा आणि विषम तिथीला संबंध ठेवल्यास मुलगी होते असे वक्तव्य केले होते. त्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. विविध स्तरातून यावर टीका केली जात आहे. परंतू दुसरीकडे इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अनेक लोकं पुढे आले आहेत. आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी इंदुरीकर महाराजांचे समर्थन करत दोन तासांच्या कीर्तनातून एखादा शब्द चुकीचा जाऊ शकतो. तो माझ्याकडून किंवा इंदुरीकर महाराज यांच्याकडूनही जाऊ शकतो. आपल्या देशात एखादा शब्द पकडणे आणि तो दाखवणे ही चुकीची सवय लागली आहे, ती बदलणे गरजेचे आहे. कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे. त्यामुळे इंदुरीकरांनाही नोटीस दिली आहे. त्याची चौकशी होईल, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.