Home क्राईम धक्कादायक : बापानेच दिली मुलाच्या हत्येची सुपारी

धक्कादायक : बापानेच दिली मुलाच्या हत्येची सुपारी


muder 3
 

सोलापूर (वृत्तसंस्था) घरात सतत त्रास देणाऱ्या मुलाची हत्या करण्याची सुपारी खुद्द बापानेच दिल्याची धक्कादायक घटना सोलापुरात उघडकीस आली आहे. शैलेश सुरेश घोंगडे असे मयत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मुलगा शैलेश हा घरात सतत खूप त्रास देत होता. त्यामुळे वडील सुरेश घोंगडे हे खूप कंटाळलेले होते. यातूनच त्यांनी मुलाला मारण्यासाठी शंकर वडजेला नामक व्यक्तीला दोन लाख रुपयांची सुपारी दिली होती. दरम्या, २९ जानेवारी रोजी कुंभारी हद्दीत पोलिसांना शैलेश घोंगडे बेशुद्धावस्थेत सापडला होता. त्याच्या गळ्याभोवती खुणा आढळल्याने, त्याचा गळा आवळून हत्या केल्याची शंका पोलिसांना आली. त्यानुसार सोलापूर ग्रामी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयितांची चौकशी केली. यामध्ये शैलेशचे वडील सुरेश घोंगडे यांनीच हत्येची सुपारी दिल्याचे उघड झाले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडालेली आहे.


Protected Content

Play sound