धरणगाव येथील अतिक्रमण संदर्भात व्यावसायिकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

dharangaon 3

धरणगाव प्रतिनिधी । नुकतेच शहरातील नगरपालिकेने मोहीम हाती घेत अतिक्रमण काढीत अनेक दुकाने जमीनदोस्त केलीत. या कारवाई अनेकांचे व्यवसाय बंद झालेत या विरोधात अतिक्रमण धारकांनी नगरपालिकेच्या दरबारी गाऱ्हाणे मांडत मुख्याधिकाऱ्यांना आज निवेदन दिले.

बुधवारी सकाळपासून सुरु असलेली कारवाई शुक्रवारी देखील सुरूच होती. तर अतिक्रमण धारक व्यावसायिकांनी नगरपालिकेवर संताप व्यक्त करीत मुख्याधिकार्यांना आपली व्यथा मांडून निवेदन सदर केले. अनेक व्यावसायिक घेल्या २०-२५ वर्षांपासून व्यवसाय करीत आहेत. नगरपालिकेचे ठेकेदार रीतसर फी अदा करीत असता तरी नगरपालिकेने आमच्यावर अन्याय करीत आमची अतिक्रमण काढलीत असा रोष नागरिकांनी व्यक्त केला. नगरपालिकेने हद्द नेमून द्यावी. नगरपालिका धोरण अवलाम्बाविण्यात यावे. हॉकर्स झोन नेमून व्यावसायिकांचे पक्क्या गाळ्यांमध्ये पुनर्वसन कराव्या अश्या मागण्या यावेळी केल्या. यावेळी जिवन भोई, गोरख महाजन, रवी माळी, नामदेव चौधरी, दिपक चौधरी, गोलू चौधरी, योगेश चव्हाण, भैया महाजन, लोटन महाजन, राहुल भोई, सत्यवान कंखरे आदींसह नागरिक उपस्थित होते.

Protected Content