यावल, सामाजिक

यावलला गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

शेअर करा !

यावल प्रतिनिधी । यावल शहरातील कॉलनी परिसरातील विराम नगरातील गजानन महाराज मंदिरात गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त मंदिरात विद्यूत रोशनाई केली आहे तर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त १५ शनिवार रोजी सकाळी ६ वाजता श्रींच्या मूर्तीचा अभिषेक व आरती सकाळी ७ वाजता श्री लघु गणेश याग व सकाळी ८ वाजता श्री गजानन महाराज यांच्या पादुकांची पालखी सोहळा आयोजित करण्यात आला. ही पालखी श्री रेणुकादेवी मंदिरापासून तर श्री गजानन महाराज मंदिरापर्यंत असणार आहे तसेच दुपारी १२ वाजता श्री लघु गणेश या व पूर्णावती त्यानंतर महाआरती व दुपारी महाआरती नंतर सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. यादरम्यान प्रा.डॉ.के.जी. पाटील, जे.टी.महाजन इंजिनिअरिंग कॉलेज फैजपुर व भूषण पाटील फैजपुर यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम होणार आहे. रात्री ७ वाजता ट्रेनची आरती तसेच रात्री ८ वाजता ह.भ.प. भूषण महाराज अंबापिंपरी तालुका पारोळा अंबापिंपरी खानदेशी युवा कीर्तनकार यांचे कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. या किर्तनाचा व पालखी मिरवणूक सोहळ्याचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गजानन महाराज सेवाभावी संस्था विरारनगर यांनी केले आहे.

  • spot sanction insta
  • advt tsh flats