क्राईम, राज्य

गाडी ओव्हरटेक करण्याच्या वादातून शिर्डीत तरुणाची हत्या

शेअर करा !

अहमदनगर (वृत्तसंस्था) गाडी ओव्हरटेक करण्याच्या वादातून मध्यरात्री शिर्डीत एका 35 वर्षीय तरुणाची हत्या झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. विठ्ठल मोरे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

  • spot sanction insta
  • advt tsh flats

शिर्डी शहरातील पिंपळवाडी रस्त्यावर श्रीकांत शिंदे आणि विठ्ठल मोरे यांच्या मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास गाडी ओव्हरटेक करण्यावरुन वाद झाला. वाद एवढा विकोपाला गेला की श्रीकांतने थेट विठ्ठलची हत्याच केली. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात खुन आणि अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.