नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ईशान्य दिल्लीतील भजनपुरा भागात एका घरात पाच जणांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. मयतांमध्ये पती-पत्नीसह तीन मुलांचा समावेश आहे.
मृतांमध्ये नवरा शंभू कुमार (४५), त्यांची पत्नी सुनीता (३८), मुलगा शिवम (१८), मुलगा सचिन (१६) आणि मुलगी कोमल (१२) अशा पाच जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे घराला बाहेरुन कुलूप लावलेले होते. भजनपुराच्या मार्ग क्रमांक ११परिसरातील एका घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला, तेव्हा त्यांना पाच मृतदेह आढळले. साधारण पाच दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. मृतदेह कुजल्यामुळे ओळख पटविणे देखील कठिण झाले होते. तर सामुहिक आत्महत्या की खून आहे याचा तपास पोलीस करीत आहोत. दरम्या, काही दिवसांपूर्वी हे कुटुंब एका घरात भाड्याने राहण्यास आले होते.