Home राष्ट्रीय ना विसरणार, ना माफ करणार; बदला घेणारच :सीआरपीएफ

ना विसरणार, ना माफ करणार; बदला घेणारच :सीआरपीएफ


नवी दिल्ली (वृत्तसेवा) आम्ही हा हल्ला विसरणार नाही आणि हल्लेखोरांना कधीही माफ करणार नाही, अशा शब्दांमध्ये सीआरपीएफने मोजक्याच मात्र तीव्र शब्दांमध्ये पुलवामातील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेचा निषेध केला आहे. सीआरपीएफने ट्विट करुन हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे.

काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरात काल दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 37 जवान शहीद झाले. या हौतात्म्यानंतर सीआरपीएफनं दिलेली प्रतिक्रिया अतिशय सूचक आणि महत्त्वपूर्ण आहे. सीआरपीएफच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पुलवामा इथं शहीद झालेल्या जवानांना आज श्रद्धांजली वाहण्यात आली. ट्विटसोबत सीआरपीएफने श्रद्धांजलीपर एक छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. ‘पुलवामामध्ये हौतात्म्य आलेल्या आमच्या बहाद्दूर जवानांना आम्ही सॅल्यूट करतो. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत. ही घटना आम्ही कधीही विसरणार नाही आणि यासाठी जबाबदार असलेल्यांना माफ करणार नाही. या नृशंस हल्ल्याचा बदला घेतला जाईल,’ असे सीआरपीएफने ट्विटमध्ये म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound