Home राजकीय कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या निलोफर आजरेकर

कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या निलोफर आजरेकर

0
88


कोल्हापूर । येथील महापालिकेच्या महापौरपदी आज काँग्रेसच्या निलोफर आजरेकर यांची आज दणदणीत मताधिक्याने निवड करण्यात आली.

अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर यांनी राजीनामा दिल्याने कोल्हापूर येथे आज महापौरपदासाठी निवडणूक घेण्यात आली. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली. यात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेच्या वतीने महापौरपदासाठी निलोफर आजरेकर यांना उमेदवारी दिली. विरोधी भाजप-ताराराणी आघाडीच्या वतीने अर्चना पागर रिंगणात होत्या. यात आजरेकर यांना ४८ मते मिळाली तर अर्चना पागर यांना फक्त एक मत मिळाले. या माध्यमातून पालकमंत्री ना. सतेज पाटील यांनी महापालिकेतील पक्षाचे वर्चस्व कायम राखण्यात यश मिळवल्याचे दिसून येत आहे.


Protected Content

Play sound