Home राज्य माझ्यातली आई आज सुन्न, नि:शब्द झालीय ! : ना. यशोमती ठाकूर

माझ्यातली आई आज सुन्न, नि:शब्द झालीय ! : ना. यशोमती ठाकूर

0
91


yashomati thakur

मुंबई प्रतिनिधी । हिंगणघाटच्या पिडीतेचा मृत्यू झाल्यानंतर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. यशोमती ठाकूर यांनी आपण सुन्न व नि:शब्द झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हिंगणघाट येथे माथेफिरूने पेटवून दिलेल्या पिडीतेचा आज पहाटे मृत्यू झाल्याने राज्यभरात तीव्र आक्रोश निर्माण झाला आहे. यावर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ना. यशोमती ठाकूर यांनी अतिशय भावपूर्ण प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ”माझ्यातली आई आज सुन्न, नि:शब्द झालीय… महाराष्ट्राच्या लेकीचा जीवनाशी संघर्ष संपला, आपण या हिंसक-पुरुषी मानसिकतेशी संघर्ष सुरू करूया.”

ना. यशोमती ठाकूर यांनी अलीकडेच या पिडीतेची रूग्णालयात विचारपूस केल्यानंतर आपल्याला अश्रू आवरले जात नसल्याचे सांगितले होते. आज याच भगिनीच्या मृत्यूमुळे आपल्याला प्रचंड धक्का बसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.


Protected Content

Play sound