Home Cities पाचोरा पाचोरा येथे पुलवामा हल्ल्यातील शाहिद जवानांना श्रद्धांजली ( व्हिडीओ )

पाचोरा येथे पुलवामा हल्ल्यातील शाहिद जवानांना श्रद्धांजली ( व्हिडीओ )


पाचोरा (प्रतिनिधी) येथील छत्रपती शिवाजी महाराज हुतात्मा स्मारकाजवळ सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटना व्यवसायिकांच्या वतीने काल पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.


शुक्रवारी (दि १५) सकाळी जम्मूच्या पुलवामामध्ये अवंतीपुरा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा संपूर्ण देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर दिल्याशिवाय शांत बसता येणार नाही, अशी भावना सर्व देशवासी व्यक्त करत आहेत. याच पार्श्वभूमीवर पाचोरा शहरातील सर्व राजकीय पक्षी सामाजिक संघटना व शहरातील नागरिकांच्या वतीने या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच सर्व शहीद जवानांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी माजी आमदार दिलीप वाघ, गटनेते संजय वाघ उपनगराध्यक्ष शरद पाटील, नगरसेवक विकास पाटील, काँग्रेसचे सचिन सोमवंशी, गणेश पाटील, मुकेश तुपेम, महेश पाटील, राजेंद्र पाटील, सुनील पाटील, राहुल बोरसे, राहुल देवरे, वीर मराठा मावळा संघटनेचे प्रशांत पाटील, शेखर पाटील, गणेश शिंदे, राहुल महाजन, कमलेश सोनार, काँग्रेसचे साहेबराव पाटील, ज्ञानेश्वर महाजन, सचिन पाटील, अनिल पाटील, अनिल पंजवानी, सुनील पंजवानी, मुकेश तुपे, सेवा मराठा सेवा संघाचे सुनील पाटील, महाजन सचिन पाटील, रवी ठाकूर, अनुप अग्रवाल, कांतीलाल जैन, संदीप महाजन, योगेश पाटील, राजू धनराळे, सह. एन. चौधरी, आदी राजकीय व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पहा– श्रध्दांजी अर्पण कार्यक्रमाचा व्हिडीओ.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound