जळगाव प्रतिनिधी । देवळाली-भुसावळ पॅसेजर मधून एक प्रवाशी विद्यार्थी माहेजी जवळ धावत्या रेल्वेतून पडल्याने लाईव्ह प्रवाशी संघटनेच्या सदस्यांच्या मदतीने दीड ते दोन किलोमीटर रेल्वे गाडी मागे घेत जखमी झालेल्या विद्यार्थ्याला घेत जळगावकडे रवाना झाली. यावेळी रेल्वे प्रशासन व लाईव्ह प्रवाशी संघटनेचे प्रवाश्यांकडून कौतूक होत आहे.
याबाबत माहिती अशी की, दररोज प्रमाणे आज महाराष्ट्र एक्सप्रेस तीन तास उशीरा धावत असल्याने आज सकाळी देवळाली भुसावळ शटलमध्ये प्रवाश्यांची मोठ्याप्रमाणावर गर्दी होती. पाचोरा येथील एमआयडीसी कॉलोनीमध्ये राहणारा राहुल संजय पाटील हा तरुण शिक्षणासाठी दररोज पाचोरा ते जळगाव दरम्यान अपडाऊन करतो. आज सकाळी परधाडे रेल्वे स्थानकावरून गाडी निघाल्यानंतर या तरुणाचा तोल जाऊन माहेजीजवळील रेल्वे खंबाक्रमांक 383 जवळ खाली पडला. सहप्रवाशी आणि त्याच्या मित्रांनी तत्परता दाखवत साखळी ओढून गाडी थांबविली. यात तो गंभीर जखमी झाला. विद्यार्थी खाली पडल्याचे लक्षात आल्यानंतर काही प्रवाश्यांनी तात्काळ ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटनेच्या सदस्यांनी संस्थापक अध्यक्ष दिलीप पाटील यांना कळविले, पाटील यांनी पाचोरा स्टेशन प्रबंधक व आरपीएफ विभागाला याबाबत माहिती पुरविली तेवढ्यात ट्रेन थांबविण्यात आली, गार्ड व ड्राईवर यांनी आपसांत चर्चा करून चौकशी केली व संघटनेकडून प्रकार घडताच प्रशासनाला कळविण्यात आल्याने त्यांनीही ड्राईवर ला विनंती आदेश केलेत, यावेळी प्रशासनाने माणसाची किंमत ठेवत भुसावळ देवळाली शटल ला मागे घेत त्या पडलेल्या विद्यार्थ्याजवळ ट्रेन नेत त्याला ट्रेन मध्ये बसविले, पुढे म्हसावद स्टेशन वर प्रथोमउपचार करण्यात येऊन पुढे उपचारासाठी रवाना करण्यात आले,
ट्रेन मागे घेण्यात आल्याने विद्यार्थ्याला वाचविण्यात यश आल्याने रेल्वे ड्रायव्हर, गार्ड, व पाचोरा रेल्वे प्रशासनाचे आभार प्रवासी वर्गातून मानण्यात आले, व अशा गर्दीला पर्याय म्हणून ट्रेन्स वेळेवर धावणे, शटल ला वाढीव बोग्या जोडणे, स्वतंत्र MST कोच जोडणे, ट्रेन ला वेळेवर सोडणे असे पाऊल तात्काळ उचलण्यास यावे असा सूर उमटला.
कोट –
आजचा घडलेला प्रकार खरोखर दयनीय होता परंतु प्रवासींनी मला व मी संबंधितांना कळवताच रेल्वे प्रशासनाने सहकार्य करत ट्रेन मागे घेत प्रवासी ला ट्रेन मध्ये घेत प्रथमउपचार केलेत या प्रकाराने आम्ही सर्वजण भारावून गेलेलो आहोत, आमची किंमत प्रशासनाकडे आहे याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो, तात्काळ यावर उपाय करून प्रवासी वर्गाला दिलासा देण्यात यावा.
– दिलीप पाटील संस्थापक अध्यक्ष- ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटना, पाचोरा